मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पहिल्या नवऱ्याचा प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू, डिप्रेशनमध्ये झोपेच्या गोळ्या खाणार होती, इतक्यात…

| Updated on: Mar 23, 2024 | 4:59 PM

तिच्यासाठी नशिबाने काहीतरी वेगळच लिहून ठेवलेलं. ती एअर होस्टेस होती. वैमानिकाच्या प्रेमात पडली. त्याच्याशी लग्न केलं. पण नियतीच्या मनात काही वेगळच होतं. तिच्याबाबतीत जे घडत गेलं, ते वेगळच होतं.

1 / 10
बॉलिवूडची ही अभिनेत्री स्वत:ची वेगळी ओळख बनवू शकली नाही. पण एका चित्रपटातील भूमिकेमुळे ती प्रेक्षकांच्या चांगली लक्षात राहिली. आजही ती दिसली की, प्रेक्षकांना ती याच भूमिकेसाठी आठवते.

2 / 10
आम्ही बोलतोय 'चक दे' फेम अभिनेत्री विद्या माळवदेबद्दल. 2007 साली आलेला शाहरुख खानचा हा चित्रपट बराच गाजला. त्यात विद्या शर्मा ही तिची व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. विद्याने गोली आणि हॉकी टीमच्या कॅप्टनची भूमिका साकारली होती.

3 / 10
विद्या माळवदेच पहिल लग्न अरविंद सिंह बग्गा यांच्यासोबत झालं होतं. कॅप्टन अरविंद सिंह पायलट होते. वर्ष 2000 मध्ये एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी विद्या डिप्रेशनमध्ये गेली होती.

4 / 10
विद्याने सांगितलं की, त्यावेळी ती एका वेगळ्याच फेजमध्ये होती. जीवन संपवण्याचा विचार तिच्या मनात यायचे. संजय डायमा यांच्याबरोबर तिने दुसर लग्न केलं.

5 / 10
मी एअरहोस्टेसच काम करायची. माझ्या पतीसोबत दुर्घटना घडली, तेव्हा मला कंपनीने पुढच फ्लाइट पकडून फ्रँकफर्टला जायला सांगितलं.

6 / 10
पतीच्या निधनाबद्दल समजल्यानंतर मला काहीच समजत नव्हत. माझ्यासाठी तो एक मोठा धक्का होता. त्यानंतर सगळ वेगळच घडत होतं. मी घरी आली, मी कोणालाच काही सांगितलं नाही.

7 / 10
माझी मनस्थिती चांगली नसल्याने कुटुंबीय माझ्यावर लक्ष ठेवून असायचे. कुठेही मला एकटीला सोडायचे नाहीत. मी डिप्रेशनमध्ये होते. मी तक्रार करायची. ते सगळ्यांच्या स्वप्नात येतात. माझ्या का नाही?.

8 / 10
एकदिवस मी ठरवलं. तू माझ्याकडे येऊ शकत नाही. मी तुझ्याजवळ येते. मी घराच्या बाहेर पडले. वेगवेगळ्या मेडिकल शॉपमधून झोपेच्या गोळ्या घेतल्या.

9 / 10
मी त्या गोळ्या खाणारच होते, इतक्यात वडील माझ्या रुममध्ये आले. ते माझ्याशी खूप बोलले. मला हसवण्याचा प्रयत्न केला.

10 / 10
त्यावेळी मला लक्षात आलं की, जो मला सोडून गेला, तो खूप प्रिय होता. पण मी माझ्या आई-वडिलांबरोबर असं वागू शकत नाही. ते सुद्धा माझ्यावर भरपूर प्रेम करतात.