Chanakya Niti | लहान मुलांची कृती म्हणजे ‘आरसा’ , तुमच्याच कृतीची पुनरावृत्ती, त्यांच्या समोर या 4 गोष्टी टाळाच नाहीतर…

| Updated on: Dec 28, 2021 | 7:49 AM

आचार्य चाणक्य हे विद्वान मानले जातात. त्यांनी त्याच्या आयुष्यात अनेक संकटांना समोरे जावे लागले होते. पण न डगमगता त्यांनी प्रत्येक गोष्टीमधून मार्ग काढला. त्यांनी त्याचे अनुभव इतरांना कळावे म्हणून चाणक्यानीती लिहली. यामध्ये आपण आयुष्यात कोणत्या गोष्टी कराव्यात हे सांगितले. चाणक्य नीतीशास्त्रानुसार, आपण बोलताना नेहमी विचार करुन बोलायला हवं. शरीराला झालेली जखम काढता येते पण मनाला लागलेल्या शब्दांची जखम मात्र आयुष्यभर राहतात. आपली मुलं आपलाच आरसा असतात. त्यामुळे त्यांच्या समोर बोलताना किंवा वागताना काही गोष्टींचे भान ठेवणे गरजेचे असते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

1 / 4
 आचार्य चाणक्य यांच्यानुसार, व्यक्तीने मुलांसमोर अपशब्द वापरू नयेत. असे केल्याने, तुमची मुले भविष्यात अपमानास्पद शब्द देखील वापरू शकतात, ज्यामुळे तुम्हाला चारचौघात लाज वाटेल. त्यामुळे मुलांसमोर अपशब्द वापरू नका. या गोष्टीमुळे तुमच्या मुलांवर वाईट संस्कार होतील.

2 / 4
पालक आपल्या मुलांना लहानपणापासून नेहमी खरे बोलायला शिकवतात. पण काही वेळा पालकही मुलांसमोर खोटे बोलतात. असे करणे योग्य नाही. असे केल्याने पालक त्यांच्या मुलांच्या नजरेतील आदर गमावतील. त्यामुळे हे करणे टाळा.

3 / 4
चाणक्य नीतीनुसार, प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीसोबत अशा गोष्टी कधीही करू नयेत, ज्यामुळे काही कारणाने तिचे हृदय दुखत असेल. तुमच्या पत्नीला नेहमी प्रोत्साहन द्या. पत्नीचा आत्मविश्वास कमी होईल किंवा घरामध्ये कलह निर्माण होईल असे काही वागू नये.

4 / 4
चाणक्यांच्या धोरणानुसार मुलांना चांगले धडे द्या. चांगले संस्कार द्या. त्यांच्यासमोर शिस्तीचे उदाहरण ठेवा जेणेकरून मुले भविष्यात जबाबदार होतील. यामुळे ते त्यांचे ध्येय सहज साध्य करू शकतील. टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.