आचार्य चाणक्य यांच्या मते, तुमच्याकडे कितीही पैसा असला, तरी तुमची नम्रता कधीही सोडू नका. नम्र व्यक्ती सर्वांनाच खूप आवडतो. नम्र लोकांना आयुष्यात अशा अनेक संधी मिळतात, ज्यातून ते संपत्ती वाढवू शकतात. माणसामध्ये पैशाचा अहंकार असेल तर तो पैसा नष्ट व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे नेहमी नम्रपणे वागा.
काही लोक पैसे दाखवून इतरांना अपमानीत करण्याचा प्रयत्न करतात. पण हे मूर्खपणाचे लक्षण आहे. हे लोक आपल्याकडे किती पैसा आहे हे दाखवण्यासाठी पैसा व्यर्थ खर्च करता आणि समोरील व्यक्तीच्या नजरेत आदरही कमी करता. पैसा असला तरी फालतू खर्च करणे टाळा. अन्यथा पैसा वाया जायला वेळ लागत नाही.
आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की जर तुमच्याकडे पुरेसा पैसा असेल तर तो लोककल्याणाच्या कामात नक्कीच गुंतवा. पैशाचा सदुपयोग केल्याने तुम्हाला मान-सन्मानही मिळतो आणि तुमच्या घरात सदैव समृद्धी राहते. शास्त्रात दानधर्म आणि परोपकाराची कामे करण्याची प्रेरणा दिली आहे.
पैसे कधीही सोबत ठेवू नका. थांबलेली गोष्ट काहीही उपयोगाची नसते. पैसांची गुंतवणूक करा. गुंतवणुकीने संपत्ती नेहमीच वाढते. आणि ज्या लोकांना पैसा साठवून ठेवायचा आहे, त्यांची संपत्ती हळूहळू संपुष्टात येते.