आचार्य चाणक्याच्या यांनी आपण आपले आयुष्य कसे जगायचे यांचे धडे दिले. आयुष्यात येणाऱ्या कठीण गोष्टींना आपण कसे सामोरे जावू शकतो याचे उत्तम शिक्षण आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे.
आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीने आपले काम व्यवस्थित मन लावून केले पाहीजे, जे लोक ही गोष्ट करत नाहीत ते आयुष्यात नेहमी अडखळतात. या व्यक्तींच्या आयुष्यात नेहमी समस्या असतात. कोणतेही काम करताना काळजी घा.
आचार्य चाणक्यांच्या मते आपण स्वच्छता राखणे खूप महत्त्वाचे असते. देवी लक्ष्मी नेहमी स्वच्छ ठिकाणी राहते. जर तुम्ही आयुष्यात स्वच्छता राखलीत तर तुमच्याकडे पैशाची चणचण कधीही भासणार नाही.
आचार्यांचा असा विश्वास होता की माणसाने नेहमी सत्याचाच आधार घेतला पाहिजे. खोटे बोलणारा माणूस स्वतःच्याच खोटेपणात अडकतो. एक खोटे लपवण्यासाठी त्याला अनेक खोटे बोलावे लागतात. अशा परिस्थितीत तो एक ना एक दिवस असा व्यक्ती नक्कीच अडचणीत येतो.
कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी व्यक्तीने कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यावा जेणेकरून त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. कारण लोक अनेकदा इतरांच्या बोलण्यात येऊन चुकीचे पाऊल उचलतात आणि असे केल्याने त्यांना नंतर खूप पश्चाताप होतो. माणसाचे मन त्याला कधीच चुकीच्या गोष्टी सांगत नाही. संकटतात सापडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस त्याचे मन योग्य मार्ग दाखवतो.