वर्षातील दुसरे चंद्रग्रहण सप्टेंबर महिन्यात दिसणार आहे. हे दुसरे चंद्रग्रहण पितृ पक्षात होणार आहे. हेच नाही तर हे चंद्रग्रहण मीन राशीत होणार आहे. उद्या आणि परवा हे चंद्रग्रहण दिसणार आहे. विशेष म्हणजे दुसरे चंद्रग्रहण आहे.
हे चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार 18 सप्टेंबरला दिसणार आहे. विदेशात हे चंद्रग्रहण 17 सप्टेंबरला दिसेल. भारतीय वेळनुसार सकाळी 6.12 दिसणार आहे. 5 तास 04 मिनिटे हे चंद्रग्रहण चालणार आहे.
कधीही चंद्रग्रहण हे प्रेग्नंट महिलांनी पाहू नये, असे सांगितले जाते. हेच नाही तर थेट डोळ्यांनीही चंद्रग्रहण पाहू नये. भारतामध्ये चंद्रग्रहणामध्ये अनेक गोष्टी या फॉलो केल्या जातात.
या चंद्रग्रहणाचा प्रभाव 12 राशींवर पडेल. हे चंद्रग्रहण यंदाच्या वर्षीचे दुसरे मोठे ग्रहण असल्याचे देखील सांगितले जाते. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते, ज्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते.
भौगोलिक गोष्टींमध्ये अनेक बदल यावेळी बघायला मिळतात. मात्र, हे चंद्रग्रहण भारतात नाही तर युरोप, आफ्रिका, उत्तर दक्षिण अमेरिका आणि एशियाच्या काही भागांमध्ये दिसणार आहे.