बाॅलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही यंदाच बाॅलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. विशेष म्हणजे एकाच चित्रपटातून तीन स्टार किड्स लाॅन्च केले जाणार आहेत.
सुहाना खान ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगली सक्रिय दिसत आहे. विशेष म्हणजे सुहाना अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसते. मात्र, यासाठी सुहाना खान हिने खूप जास्त मेहनत ही घेतलीये.
सुहाना खान हिने जबरदस्त असे ट्रांसफॉर्मेशन केले आहे. सुहाना खान हिचे काही वर्षांपूर्वीचे फोटो आता बघितले की, नक्कीच विश्वास नाही बसणार की, ही सुहाना खान आहे.
गेल्या काही वर्षांपासून सुहाना खान हिने आपल्या फिटनेसकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आता किंग खानची लेक अत्यंत बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते.
विशेष म्हणजे सुहाना खान हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करताना कायमच सुहाना दिसते.