सलमान खान याच्या बिग बाॅस ओटीटी सीजन 2 बद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळत आहे. या सीजनला 17 जूनपासुन सुरूवात होत आहे. सहभागी होणाऱ्या स्पर्धेकांची यादीही पुढे आलीये.
नुकताच बिग बाॅस ओटीटी सीजन 2 च्या निर्मात्यांनी प्रेक्षकांना बिग बाॅसच्या घराची एक झलक दाखवली आहे. अत्यंत आलिशान असे यंदाचे घर असणार आहे.
जियो सिनेमाकडून बिग बाॅस ओटीटीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये संपूर्ण घराची एक झलक पाहण्यास मिळत आहे.
यंदाच्या बिग बाॅस ओटीटी सीजन 2 मध्ये अनेक नामवंत नावे सहभागी होणार आहेत. फलक हिच्यापासून ते आलिया सिद्दीकीपर्यंत अनेक चर्चेत असलेले नाव धमाका करताना दिसणार आहेत.
यंदाच्या सीजनला किचन अत्यंत खास करण्यात आले असून गार्ड्न परिसर देखील आकर्षित करण्यात आलाय. बेडरूमची डिझाईनही अत्यंत खास दिसत आहे.