हे हिमाचल किंवा काश्मीर नाही… हा प्रकार वेगळाच…
pollution in rivers: फोटोमध्ये दिसणारे दृश्य हिमाचल प्रदेश, काश्मीरसारख्या पहाडी भागातून वाहणाऱ्या नद्यांचे वाटते. त्या ठिकाणी प्रचंड थंडीमुळे नदीपात्रात बर्फ जमा होतो. मग ते दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची रेलचेल त्या भागात होते. परंतु फोटोमधील प्रकार वेगळाच आहे...
1 / 5
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातून डोंगरी व तितूर नद्या वाहतात. परंतु पर्यावरणास धोका निर्माण करण्याचे काम या नदी परिसरात सुरु आहे. यामुळे केमिकल युक्त पाण्याने नदी फेसाळली गेली आहे.
2 / 5
चाळीसगाव शहरातील डोंगरी व तितूर नदीपात्राला प्रदूषणाचा मोठा विळखा बसला आहे. तितूर नदीपात्रातील दूषित पाण्यामुळे फेस तयार होत आहे. नदीपात्रात फेस तयार होऊन फेसचे ढिगार रस्त्यावर येऊ लागले आहे.
3 / 5
नद्यांमध्ये केमिकलयुक्त पाणी सोडले जात असताना नगरपरिषदेकडून काहीच कारवाई केली गेली नाही. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ शांत आहे.
4 / 5
नद्यांमधील प्रदूषण हा गंभीर विषय बनत चालला आहे. प्रदूषणामुळे नद्यांचे स्वरुप नाल्याप्रमाणे झाले आहे. परंतु त्यासंदर्भात कारवाई प्रशासनाकडून होत नाही. त्यामुळे या ठिकाणी नदी होती, असे भविष्यात मुलांना सांगावे लागणार आहे.
5 / 5
शासनाच्या धोरणामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी आहे. शासनाचे नियम पायदळी तुडवले जात असताना काहीच कारवाई होत नाही, यामुळे कंपन्यांना धाक उरलला नाही.