पेटवलेली घरं, जाळलेलं हॉटेल, राख झालेल्या कार… बीड दौऱ्यात छगन भुजबळ यांनी काय काय पाहिलं?
मराठा समाजाचं आरक्षणासाठीचं शांततेत सुरु झालेलं हे आंदोलन काही ठिकाणी तीव्र झालं. यात बऱ्याच नेत्यांच्या मालमत्तेचं नुकसान झालं, उपाय म्हणून नेत्यांना सुरक्षा देखील पुरवण्यात आली होती. दरम्यान झालेल्या नुकसानीचे हे काही फोटो आहेत. छगन भुजबळ यांनी सनराईज हॉटेलचे मालक सुभाष राऊत यांची भेट घेतली आणि आंदोलकांनी पेटवून दिलेल्या हॉटेलची पाहणी केली. फोटोत असणारं हे पंचतारांकित हॉटेल तुम्ही पाहू शकता. या हॉटेलची अवस्था सध्या अशी आहे.
1 / 9
ओबीसींमध्ये मराठ्यांचा समावेश करावा आणि मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. त्यासाठी जरांगेंनी उपोषण सुद्धा केलं. ओबीसी समाजात एकच खळबळ उडाली.
2 / 9
यानंतर ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसीत घेण्यास विरोध केला. आमच्या आरक्षणाचा टक्का कमी होईल असं त्यांचं म्हणणं होतं. जरांगे पाटलांचं उपोषण, ओबीसी समाजातील खळबळ, त्यात ओबीसी नेत्यांची विशेषतः छगन भुजबळांची वक्तव्ये हे सगळं खूप चर्चेत होतं.
3 / 9
आज राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे उद्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बीड मध्ये पोहचल्यावर छगन भुजबळांचं जंगी स्वागत करण्यात आलं.
4 / 9
बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर छत्रपती संभाजीनगर कडून बीडच्या दिशेने जात असताना त्यांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ठीकठिकाणी जल्लोषात स्वागत केले.
5 / 9
छगन भुजबळ यांच्या समता परिषदेचे बीडचे जिल्ह्याचे मुख्य पदाधिकारी सुभाष राऊत यांचं सनराईज हे पंचतारांकित हॉटेल मराठा आंदोलकांकडून पेटवण्यात आल होतं.
6 / 9
छगन भुजबळ यांनी सनराईज हॉटेलचे मालक सुभाष राऊत यांची भेट घेतली आणि आंदोलकांनी पेटवून दिलेल्या हॉटेलची पाहणी केली. फोटोत असणारं हे पंचतारांकित हॉटेल तुम्ही पाहू शकता. या हॉटेलची अवस्था सध्या अशी आहे.
7 / 9
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बीड शहरात झालेल्या हिंसाचारात जयदत्त क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके यांचं घर आंदोलकांनी पेटवून दिलं होत. या दोन्ही नेत्यांच्या घरांनाही भुजबळ यांनी भेट दिलीये.
8 / 9
मराठा समाजाचं आरक्षणासाठीचं शांततेत सुरु झालेलं हे आंदोलन काही ठिकाणी तीव्र झालं. यात बऱ्याच नेत्यांच्या मालमत्तेचं नुकसान झालं, उपाय म्हणून नेत्यांना सुरक्षा देखील पुरवण्यात आली होती. दरम्यान झालेल्या नुकसानीचे हे काही फोटो आहेत.
9 / 9
बीडमध्ये मराठा आंदोलना दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) कार्यालय पेटविण्यात आले होते. आज राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या कार्यालयाची पाहणी केली.