मुख्यमंत्र्यांच्या रोड शो दरम्यान शिंदे गट- ठाकरे गट आमने सामने, प्रचंड घोषणाबाजी

| Updated on: May 16, 2024 | 2:55 PM

लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा पाचवा टप्पा सुरु आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा आहे. प्रचारासाठी दोन दिवस राहिले आहेत. यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा आणि रोड शो केले जात आहे.

1 / 5
नाशिकमध्ये शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे आणि भाजप उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभा घेतली. त्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोड शोसाठी दाखल झाले.

2 / 5
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो सुरु असताना शिंदे गट- ठाकरे गट आमने सामने आले. ठाकरे गटाकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाणचा इशारा करुन ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना जोरदार उत्तर दिले.

3 / 5
प्रचंड पोलीस बंदोबस्तामुळे मुख्यमंत्र्यांचा रोड शो सुरळीत पार पडला. यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते. पोलिसांनी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना पुढे जाऊ दिले नाही. यामुळे पुढील अनर्थ टळला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोडशोमध्ये पालकमंत्री दादा भुसे बाईकवर होते. मुख्यमंत्र्यांच्या रोड शोचा मार्ग मोकळा करण्यासाठी दादा भुसे यांनी बाईकवर प्रवास केला.

4 / 5
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार रथासमोर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यात  ''50 खोके एकदम ओके''ची घोषणा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची दिली.

5 / 5
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी धनुष्यबाणाचा इशारा करून ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्र्यांच्या त्या उत्तराने ठाकरे गटाचे कार्यकर्ते शांत झाले होते.