तरुण दिसण्यासाठी चिनी महिला फॉलो करतात या 5 ब्युटी हॅक्स!

| Updated on: Sep 07, 2023 | 5:49 PM

चायनीज लोकं, विशेषतः मुली कितीही वय झालं तरी तरुण दिसतात. आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की अशा चेहऱ्यासाठी त्या काय रुटीन फॉलो करत असतील. त्या काय खात असतील, काय पित असतील. या काही सवयी आहेत ज्या तुम्हाला चायनीज लोकांसारखी स्किन मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

1 / 5
आपल्याकडे ग्रीन टी फारशी प्यायली जात नाही. चीनमध्ये ग्रीन टी पिणे खूप सामान्य आहे. पॉलीफेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट्स ग्रीन टी मध्ये असतात. ग्रीन टी प्यायल्याने अकाली वृद्धत्त्व येत नाही.

2 / 5
तुई ना मसाज: चिनी लोकांमध्ये तुईना मसाजला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा एक मसाजचा असा प्रकार आहे ज्यात ऍक्युप्रेशर पॉइंटवर पलक्ष दिलं जातं. चेहऱ्यावर हा मसाज केल्यास स्नायूंना आराम मिळू शकतो आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होऊ शकतात.

3 / 5
चायनीज कल्चर मध्ये झोप आणि आरामाला खूप महत्त्व आहे. ७ ते ८ तास व्यवस्थित झोप घेतली, आराम केला आणि मसाज घेतला तरीही स्किन खूप चांगली राहते.

4 / 5
सनस्क्रीन: आपल्याकडे सुद्धा अनेक सेलेब्रिटी आपल्याला सनस्क्रीन वापरण्याचा सल्ला देतात. चेहऱ्याला काहीही न लावता सनस्क्रीन जरी रोज लावली तरी चेहरा उत्तम होईल असं सांगितलं जातं. याशिवाय उन्हापासून संरक्षण करण्यासाठी गॉगल, हॅट याचा वापर देखील चीनमध्ये केला जातो.

5 / 5
तुम्ही अनेक चायनीज सिरीजमध्ये, चित्रपटांमध्ये सुद्धा पाहिलं असेल खूप प्रकारच्या भाज्या, फळे, डाळी, भात असा सगळा संतुलित आहार असतो. असा आहार असेल तर त्वचा तरुण राहते. या सगळ्यामुळे चिनी लोकांची स्किन खूप चांगली असते.