2 ऑक्टोबर 2021 रोजी शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्सचे सेवन आणि तस्करी केल्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर एक नाव प्रचंड चर्चेत आहे ते म्हणजे समीर वानखेडे यांचे.
शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्यानंतर समीर वानखेडे यांच्यावरही अनेक गंभीर आरोप केले गेले. आता समीर वानखेडे यांच्याबद्दल अत्यंत मोठी माहिती पुढे येत आहे.
समीर वानखेडे यांच्यावर एक बायोपिक तयार केली जाणार आहे. विशेष म्हणजे यावर कामही सुरू आहे. निर्मात्यांनी काही अभिनेत्यांशी यासाठी संपर्क केल्याचे देखील सांगितले जात आहे.
या बायोपिकचे शूटिंग याचवर्षी शेवटी केले जाणार आहे. निर्माते जीशान अहमद हे या बायोपिकची निर्मिती करणार आहेत. यामध्ये समीर वानखेडे यांच्याबद्दल दाखवले जाईल.