Aai Kuthe Kay Karte: ‘अरुंधती’च्या लेकीच्या वाढदिवसाचं अनोखं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव
'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिच्या खऱ्या आयुष्यातील लेकीचा वाढदिवस अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या वाढदिवसाचे फोटो मधुराणीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
1 / 9
'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिच्या खऱ्या आयुष्यातील लेकीचा वाढदिवस अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या वाढदिवसाचे फोटो मधुराणीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
2 / 9
'दरवर्षी स्वरालीचा वाढदिवस काहीतरी वेगळ्या पद्धतीने साजरा व्हावा अशी आमची इचछा असते. यावर्षी स्वरालीला मित्र मैत्रिणींबरोबर कुकींग करायचं होतं, त्यामुळे तशी जागा शोधत असताना प्रमोदला हे रेस्टॉरंट सापडलं आणि मुलांनी एक वेगळं जग पाहिलं,' असं लिहित त्यांनी या अनोख्या रेस्टॉरंटविषयी माहिती दिली.
3 / 9
पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील या रेस्टॉरंटमध्ये कर्णबधीर आणि ऑटिस्ट मुलं काम करतात. कॅन्सरवर काम करणाऱ्या डॉक्टर सोनल कापसे यांची ही संकल्पना आहे. मधुराणी यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये या रेस्टॉरंटची काही खास वैशिष्ट्येही सांगितली आहेत.
4 / 9
इथल्या बेकरीमध्ये ऑटिस्ट मुलं काम करतात आणि आपल्यालाही लाजवतीलशी अतिशय उत्तम बेकरी प्रॉडक्ट बनवतात, असं त्यांनी म्हटलंय. कपकेक्स, पिझ्झा, चोकोलाव्हा केक अशा विविध पदार्थांची चव त्यांनी इथे चाखली.
5 / 9
इथल्या कर्णबधीर मुलं, मुली ही शेतकऱ्यांची लेकरं आहेत आणि सोनल कापसे या त्यांची राहायचीसुद्धा सोय स्वतःच्या जीवावर करतात.
6 / 9
या रेस्टॉरंटमध्ये वर्ल्ड क्युझिन (जागतिक पदार्थ) मिळतात आणि इथल्या पदार्थांसाठी वापरले जाणारे सर्व जिन्नस थेट शेतातून येतात, असंही त्यांनी सांगितलं आहे. जेवणात आरोग्य आणि चव वाढवण्यासाठी नाचणी, ज्वारी, कोडो, बार्नयार्ड, राजगिरा यांसारखे धान्य वापरले जातात. प्रिझर्व्हेटिव्ह, रंग आणि ऍडिटिव्ह नसलेले हे पदार्थ असतात.
7 / 9
स्वराली आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी या रेस्टॉरंटमध्ये कुकिंग केलं, गेम्स खेळले, सांकेतिक भाषा शिकले. हे फक्त रेस्टॉरंट नाही तर एक अनुभव आहे, असं मधुराणी यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय.
8 / 9
अशा विचाराने आणि वेगळ्या ध्येयाने काम करणाऱ्यांना आपण साथ दिली पाहिजे, असं आवाहन 'अरुंधती' म्हणजेच मधुराणी यांनी केलं आहे.
9 / 9
मुलीचा वाढदिवस इतक्या अनोख्या पद्धतीने साजरा केल्याबद्दल चाहते त्यांचं कौतुक करत आहेत.