Aamir Khan | फक्त या कारणामुळे आमिर खान याने घेतला ‘किरण राव’सोबत घटस्फोट, अभिनेत्याचा मोठा खुलासा
आमिर खान हा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फ्लाॅप गेल्यापासून तो कोणत्याही पार्ट्यांमध्ये किंवा कार्यक्रमांना देखील हजेरी लावत नाही.
1 / 5
बाॅलिवूड अभिनेता आमिर खान याचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. मात्र, लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फ्लाॅप गेला. आमिर खान याला या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.
2 / 5
आमिर खान हा सध्या त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. या मुलाखतीमध्ये त्याने पर्सनल लाईफबद्दल महत्वाची माहिती शेअर केली. इतकेच नाहीतर किरण राव हिच्यासोबत घटस्फोट नेमक्या कोणत्या कारणामुळे घेतला हे देखील आमिर खान याने सांगितले आहे.
3 / 5
आमिर खान म्हणाला की, माझ्या आणि किरणच्या बॉन्डिंगमध्ये मोठे बदल झाले. ज्यामुळेच विभक्त होण्याचे ठरवले. मुळात म्हणजे किरण आणि मी एक फॅमिली आहोत. मात्र, पती आणि पत्नी म्हणून आमच्या नात्यात मोठे बदल झाले.
4 / 5
इतकेच नाहीतर पुढे आमिर खान म्हणाला की, आम्ही एकत्र काम करत होतो, आम्ही एकमेकांच्या जवळ होतो. पण आमच्यामध्ये एक पती आणि पत्नी नाते नव्हते. म्हणूनच आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
5 / 5
यावेळी आमिर खान याने अत्यंत मोठा खुलासा केला आहे. आमिर खान म्हणाला की, ज्यावेळी मी रीना हिच्यासोबत वेगळे होण्याचा निर्णय घेतला त्यावेळीही माझ्या आयुष्यात कोणी नव्हते आणि आता मी किरणपासून वेगळा झालो आहे तरीही माझ्या आयुष्यात कोणी नाहीये.