अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बॉलिवूडची एक सुंदर जोडी आहे. जेव्हा त्यांची मैत्री प्रेमात परिवर्तीत झाली, तेव्हा त्यांनी कायमचं एकत्र राहण्याचं ठरवलं आणि आजपर्यंत ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत.
'गुरू' चित्रपटाच्या सेटवर, ऐश्वर्या आणि अभिषेक हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनीही ठरवलं की लग्न करायचं. डीएनएच्या वृत्तानुसार, एका मुलाखतीत अभिषेकनं सांगितलं होतं की जेव्हा ते त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त मालदीवला गेले तेव्हा त्यांची पहिली डेट खराब झाली होती.
अभिषेक त्या डेटविषयी सांगताना म्हणाला की वाऱ्यामुळे मेणबत्त्या निघून गेल्या होत्या, जेवणात वाळू भरलेली होती.
यापूर्वी एका मुलाखतीत अभिषेकनं सांगितलं होतं की तो आणि ऐश्वर्या अनेक वर्षांपासून मित्र आहेत. अभिषेकनं सांगितलं की त्यानं आणि ऐश्वर्यानं 'ढाई अक्षर प्रेम के' हा चित्रपट केला होता आणि अभिषेकचा हा दुसरा चित्रपट होता.
पत्नी ऐश्वर्या रायविषयी बोलताना अभिषेक म्हणतो की मला वाटतं की माझ्या पत्नी बद्दलची सर्वात रोमँटिक आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मी तिच्याबरोबर तासंतास शूटिंग करू शकतो आणि बोलू शकतो.
अभिषेक यांनी सांगितलं की आम्ही बर्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. आमच्यात काहीतरी होतं, कदाचित म्हणूनच या आम्ही पुन्हा एकत्र आलो आणि एक झालो. अभिषेक आणि ऐश्वर्यानं 20 एप्रिल 2007 रोजी लग्न केलं होतं. लग्नाच्या तीन वर्षानंतर म्हणजेच 16 नोव्हेंबर 2007 रोजी, दोघंही एका मुलीचे पालक झाले.