Ranbeer And Alia Bhatt | रणबीर-आलिया भट्ट विमानतळावर स्पॉट, नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लव्हबर्ड्स कुठे निघाले ?
प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट ही जोडी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सुट्टीवर गेले आहेत. हे दोघेही विमानतळावर मॅचिंग कपड्यांमध्ये स्पॉट झाले आहेत.
1 / 5
मुंबई : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी बॉलिवूड सेलिब्रेटी सुट्टीवर वेगवेगळ्या ठिकाणावर जात आहेत. आज सकाळी कियारा आडवाणी तसेच सिद्धार्थ मल्होत्रा विमानतळावर झळकले. तर आता लव्हबर्ड्स आलिया आणि रणबीरदेखील विमानतळावर स्पॉट झाले आहेत.
2 / 5
आलिया आणि रणबीर कपूर एअरपोर्टवर मॅचिंग आउटफिट्समध्ये दिसले.
3 / 5
अभिनेता रणबीर कपूर हा सुरुवातीच्या स्टार्सपैकी एक होता ज्यांना दुसऱ्या लाटेत प्राणघातक आजाराची लागण झाली होती. त्याची आई आणि दिग्गज स्टार नीतू कपूर यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलद्वारे खुलासा केला होता. आलिया भट्टही कोरोना पॉझिटिव्ह होती. तिनं स्वतःला होम क्वारंटाइन करून घेतलं होतं.
4 / 5
तर दुसरीकडे रणबीर कपूरने निळ्या रंगाचे टी-शर्ट आणि ऑलिव ग्रीन कलरची प्रॅन्ट तसेच जॅकेटसुद्धा परिधान केले होते.
5 / 5
ही जोडी ब्रम्हास्त्र या चित्रपटात सोबत झळकणार आहे. याव्यतिरिक्त आलिया रणवीर सिंहसोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामध्ये अभिनय करणार आहे