तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयच्या काैशल्यावर लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता सिद्धार्थ हा त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आलाय.
सिद्धार्थ याने आता चक्क विमानतळावरील अधिकाऱ्यांवर आरोप केला आहे. CRPF ने आपल्याला 20 मिनिट काहीही कारण नसताना त्रास दिल्याचे त्याने म्हटले आहे.
इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत सिद्धार्थ म्हटले की, मदुराई विमानतळावर 20 मिनिटे त्रास दिला...त्यांनी माझ्या पालकांच्या बॅगमधून सिक्के काढले.
आम्ही त्यांना सतत इंग्रजीमध्ये बोलण्याचे सांगत होतो...परंतू हे फक्त हिंदीमध्येच बोलत होते. आता सिद्धार्थ पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.
सिद्धार्थ हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी तो कायमच व्हिडीओ आणि फोटोही शेअर करतो.