मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला. आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना विक्रम गोखले यांचे निधन झाले.
मराठी सिनेसृष्टीतील एक महत्वाचा चेहरा कायमसाठी हरवला आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केलीये.
विक्रम गोखले यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. संजय लीला भन्साली यांच्या हम दिल दे चुके सनम, भूल भुलैया, मिशन मंगल, दिल से, दे दना दन, आणि अग्निपथ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत.
विक्रम गोखले यांच्या वडिलांनीही 50 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. मराठी सिनेसृष्टीतील एक मोठा हिरा आज आपण गमावला आहे. विक्रम गोखले यांच्या जाण्याने मोठी दरी नक्कीच निर्माण झालीये.
अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले यांच्यामध्ये एक खास नाते होते. करिअरच्या सुरूवातीच्या काळात अमिताभ बच्चन यांनी विक्रम गोखले यांना खूप जास्त मदत केलीये. ज्यावेळी विक्रम गोखले मुंबईमध्ये घर शोधत होते, त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी विक्रम गोखले यांची मदत केली.