Dhanashri Kadgaonkar | ‘वहिनीसाहेबां’चा चिमुकला ‘राजकुमार’ पाहिलात का? पाहा धनश्री आणि बाळाचे क्युट फोटो!
या वर्षीच्या सुरुवातीसच धनश्रीने बाळाला जन्म दिला आहे. तिने आपल्या बाळाचे नाव ‘कबीर’ असे ठेवले आहे. धनश्री या काळात सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होती. प्रेग्नंसीच्या काळातले तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आले होते.
1 / 5
‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेमध्ये ‘नंदिता’ ही भूमिका साकारत अभिनेत्री धनश्री काडगावकर प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचली. धनश्रीने साकारलेली ‘नंदिता’ प्रेक्षकांना खूप आवडली. मात्र, मालिका यशाच्या शिखरावर असतानाच तिने या भूमिकेला अलविदा केला होता.
2 / 5
अशावेळी तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, गोड बातमी कळताच प्रेक्षकांना खूप आनंद झाला होता. या वर्षीच्या सुरुवातीसच धनश्रीने बाळाला जन्म दिला आहे. तिने आपल्या बाळाचे नाव ‘कबीर’ असे ठेवले आहे. धनश्री या काळात सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होती. प्रेग्नंसीच्या काळातले तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आले होते. धनश्रीच्या डोहाळे जेवणाचे फोटोही खूप चर्चेत आले होते.
3 / 5
माझिया प्रियाला प्रित कळेना’ या मराठी मालिकेतून धनश्रीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्यानंतर ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘जन्मगाठ’ या मालिकेतूनही धनश्री प्रेक्षकांसमोर आली होती. मात्र, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून धनश्री घराघरात पोहचली. तिची ‘वहिनीसाहेब’ ही भूमिका चांगलीच गाजली. मालिका विश्वात सक्रिय असतानाच 2013मध्ये धनश्रीने दुर्वेशसोबत लग्नगाठ बांधली. आता खऱ्या आयुष्यातही एक नवी भूमिका सशक्तपणे सांभाळण्यास धनश्री तयार झाली आहे.
4 / 5
धनश्रीने या आधी अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत पण आता ती एका पौराणिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. धनश्री मोठ्या गॅपनंतर प्रेक्षकांच्या भेटीस येतेय त्यामुळे तिची उत्सुकता शिघेला पोहोचली आहे आणि तिच्या चाहत्यांना देखील तिला पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत बघण्याची तितकीच उत्सुकता आहे.
5 / 5
चातुर्मासातल्या कथा आणि व्रतवैकल्य प्रेक्षकांना मालिकारूपात ‘घेतला वसा टाकू नको’ या कार्यक्रातून पाहायला मिळतात आणि हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. या कार्यक्रमात नवरात्री विशेष भागात धनश्री काडगावकर (Dhanashri Kadgaonkar) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.