हीना खान गेले अनेक वर्षे चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतून करिअरची सुरुवात करणाऱ्या हीनाची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
हीना अशी अभिनेत्री आहे जी साडीपासून बिकिनीपर्यंत आपल्या सौंदर्याची जादू पसरवत असते.
हीना सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि तिनं नुकतंच तिचे काही देसी स्टाईल फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये हीना प्रियांका चोप्राच्या देसी गर्ल लूकमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये ती सुंदर साडी परिधान करून दिसत आहे.
प्रत्येक फोटोमध्ये ती वेगळी पोज देताना दिसत आहे. हीनाची ही साडी मनीष मल्होत्रानं डिझाईन केली आहे.
हीना खाननं आता मोठ्या पडद्यावरही प्रवेश केला आहे. हीना तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांमध्येही वर्चस्व गाजवते.