अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत यांनी हिमाचल येथील मंडी मतदार संघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि खासदर झाल्या.
खासदार झाल्यापासून कंगना प्रचंड व्यस्त आहेत. राजकारणात प्रवेश केल्यामुळे सिनेमांकडे दुर्लक्ष होत आहे... असं वक्तव्य देखील त्यांनी एका मुलाखतीत केलं.
आता कंगना यांच्या काही फोटोंची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील फोटो तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
कंगना बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शिवाय कंगना कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात.
कंगना सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी त्या कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.