‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत अभिनेत्री मुग्धा गोडबोलेंची होणार एण्ट्री, अपूर्वाच्या आयुष्यात होणार मोठा बदल!
स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. मालिकेतील प्रत्येक पात्र लोकप्रिय झालं असून कानेटकर आणि वर्तक कुटुंब प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग झालंय. लवकरच मालिकेत अपूर्वाच्या आईची एण्ट्री होणार आहे.
1 / 5
स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. मालिकेतील प्रत्येक पात्र लोकप्रिय झालं असून कानेटकर आणि वर्तक कुटुंब प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग झालंय. लवकरच मालिकेत अपूर्वाच्या आईची एण्ट्री होणार आहे.
2 / 5
अभिनेत्री मुग्धा गोडबोले अपूर्वाच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. मुग्धा उत्त्तम अभिनेत्री तर आहेच मात्र लेखिका म्हणूनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्टार प्रवाहच्या आई कुठे काय करते मालिकेचं संवाद लेखन त्या करत असून त्यांच्या लेखनाचं कौतुक होत आहे.
3 / 5
ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना त्या म्हणाल्या, ‘ठिपक्यांची रांगोळी ही मालिका प्रेक्षकांना आवडतेय. त्यामुळे या मालिकेचा भाग होताना अतिशय आनंद होतोय. अंजली वर्तक असं या व्यक्तिरेखेचं नाव आहे. या पात्राच्या येण्याने मालिकेत खळबळ उडणार आहे. अश्या प्रकारच्या भूमिका माझ्या वाट्याला खूप कमी येतात.
4 / 5
‘आतापर्यंत मी मालिकांमध्ये खूप सोज्वळ व्यक्तिरेखा साकरल्या आहेत. त्यामुळे हे पात्र साकारणं नवं आव्हान असणार आहे. माझा लकूही खूप वेगळा आहे. ठिपक्यांची रांगोळी मालिकेत सर्वच कलाकार दिग्गज आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा येतेय अशी भावना मुग्धा गोडबोले यांनी व्यक्त केली.’
5 / 5
अंजली वर्तक या पात्राच्या एण्ट्रीने नेमकं काय घडणार हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल त्यासाठी पाहायला विसरु नका ठिपक्यांची रांगोळी सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता फक्त स्टार प्रवाहवर!