मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी ‘राधा’ अर्थात अभिनेत्री श्रुती मराठे (Actress Shruti Marathe) ही मनोरंजन विश्वाबरोबरच सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असलेली ही मराठमोळी अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करतेय.
आता तिनं तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
अभिनेत्री श्रुती मराठेचा जन्म बडोद्याचा. मात्र, त्यानंतर तिचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. पुण्याच्याच शाळेत श्रुतीचं शिक्षण झालं. शाळेत असल्यापासूनच श्रुतीला अभिनय आणि खेळाची प्रचंड आवड होती. दहावीत असताना तिला पहिल्यांदाच अभिनय करण्याची संधी मिळाली. ‘पेशवाई’ या मालिकेतून तिने अभिनय विश्वात पदार्पण केले होते. पुढे महाविद्यालयीन जीवनात तिने शिकत असतानाच, नाटकातून काम करायचे ठरवले .
अभिनयाच्या वेडापायी श्रुतीने मुंबई गाठली. यानंतर तिला पहिल्यांदा तामिळ चित्रपटात संधी मिळाली. या चित्रपटात तिच्या अभिनायचे खूप कौतुक झाले. मनोरंजन विश्वात पदार्पण करताना श्रुतीने आपलं नाव ‘हेमामालिनी’ असं केलं होतं. मात्र, नंतर तिने आपलं नाव श्रुती प्रकाश असं केलं. दक्षिणात्य मनोरंजन विश्वात आजही श्रुती ‘श्रुती प्रकाश’ या नावानेच ओळखली जाते.
श्रुती मराठेने ‘सनई-चौघडे’ या चित्रपटातून मराठीत पदार्पण केले. तिची या चित्रपटातील छोटीशी भूमिका देखील चाहत्यांच्या लक्षात राहिली. यानंतर श्रुती अनेक मराठी चित्रपटात झळकू लागली. छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘राधा ही बावरी’ या मधून तिला खरी ओळख मिळाली.