उर्फी जावेद ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या फॅशनमुळे चर्चेत आहे. अनेकदा उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जातात. उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली असते.
नुकताच उर्फी जावेद हिने मोठा खुलासा केला आहे. आज जरी उर्फी जावेद ही बाॅलिवूड अभिनेत्रींपेक्षा अधिक कमाई करत असली तरीही एक काळ असा उर्फी जावेद हिच्या आयुष्यात होता की, तिला राहण्यासाठी घर नव्हते.
उर्फी जावेद हिला राहण्याठी घर नसल्याने चक्क उर्फी गार्डन तर कधी रस्त्यावर आणि फुटपाथवर झोपत होती. आपल्या जुन्या दिवसांची आठवण काढत उर्फी जावेद हिने सांगितले की, मुंबईमध्ये आल्यावर कशी राहण्याची वेळ तिच्यावर आली.
उर्फी जावेद म्हणाली, बऱ्याच वेळा मी माझ्या मित्रांकडे पण राहत होते. सुरूवातीच्या काळात मी जास्त करून गार्डनमध्ये झोपत होते. मात्र, आता माझ्याजवळ सर्वकाही आहे.
उर्फी जावेद हिने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये.