Hardik-Ananya Affair : हार्दिक-अनन्या खरच मनाने जवळ आलेत का? जवळच्या माणसाने सांगितलं पडद्यामागचं सत्य
Hardik-Ananya Affair : सध्या हार्दिक पांड्या आणि अनन्या पांडेच्या अफेयरची चर्चा सुरु झाली आहे. अनंत अंबानीच्या लग्नापासून या चर्चेने जोर पकडला आहे. आता एका जवळच्या माणसाने या नात्यामागच सत्य सांगितलं आहे.
1 / 6
हार्दिक पांड्याचा घटस्फोट झालाय. मागच्या आठवड्यात नताशा स्टानकोविक आणि त्याने विभक्त होत असल्याच जाहीर केलं. तेव्हापासून हार्दिकच नाव अनन्या पांडेसोबत जोडलं जातय.
2 / 6
अनंत अंबानीच्या लग्नात हार्दिक पांड्या आणि अनन्या पांडे एकत्र डान्स करताना दिसले होते. दोघांचे एकत्र व्हिडिओ व्हायरल झाले. फॅन्सकडून दोघांची जोडी जुळवली जात आहे.
3 / 6
अनंत अंबानीच्या लग्नानंतर हार्दिक पांड्या आणि अनन्या पांडे यांनी सोशल मीडियावर परस्परांना फॉलो करायला सुरुवात केली. त्यामुळे दोघांच्या डेटिंग, अफेयरच्या चर्चांनी जोर पकडला. बॉलिवूड लाइफने अनन्या पांडेच्या एका जवळच्या व्यक्तीच्या हवाल्याने या नात्यामागचं सत्य सांगितलं आहे.
4 / 6
अनंत अंबानींच्या लग्नात हार्दिक आणि अनन्याने बराच वेळ एकत्र घालवला. अनन्या अशीच आहे. ती नव्या व्यक्तीला भेटल्यानंतर फ्रेंडली होते. ती लोकांमध्ये लगेच मिसळते. तो आनंदाच क्षण होता. प्रत्येक जण एन्जॉय करत होता, असं या सूत्राने सांगितलं.
5 / 6
जे कोणी यात रोमँटिक अँगल शोधतायत, त्यांना एवढच सांगेन की, ती सध्या तिच्या कामावर लक्ष देतेय. तिचे अनेक चित्रपट आणि ओटीटी प्रोजेक्टस लाइनमध्ये आहेत.
6 / 6
अनन्याला आपली सगळी एनर्जी करियरवर फोकस करण्यात लावायची आहे. म्हणून अनन्या आणि हार्दिकला कपल बनवणाऱ्या सगळ्या स्टोरीज तथ्यहीन आहेत, त्याला अर्थ नाही असं या सूत्राने सांगितलं.