शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याचे नाव पोर्नोग्राफी प्रकरणात आल्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. यादरम्यान अनेकांनी थेट शिल्पा शेट्टी हिच्यावर देखील टिका केली.
पोर्नोग्राफी प्रकरणात नाव आल्यानंतर राज कुंद्रा हा सार्वजनिक ठिकाणी काळ्या रंगाचे फेस मास्क लावून फिरताना अनेकदा स्पाॅट झाला. पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा याला तब्बल दोन महिने जेलमध्ये राहवे लागले होते.
दोन महिने जेलमध्ये राहिल्यानंतर राज कुंद्रा याला जामीन मिळाला. अनेकदा पापाराझी यांनी काळ्या रंगाच्या फेस मास्कमध्येच राज कुंद्रा याचे फोटो काढले.
नुकताच एका पार्टीमधून बाहेर पडताना राज कुंद्रा हा दिसला होता. मात्र, यावेळी राज कुंद्रा याच्या चेहऱ्यावर मास्क दिसले नाही. याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
राज कुंद्रा हा काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसला. अनेकांनी या फोटोवर कमेंट करत लिहिले की, आता कसे काय फेस मास्कशिवाय फिरत आहे. युजर्सने मोठ्या प्रमाणात या फोटोवर कमेंट केल्या आहेत.