ऐश्वर्या राय तरुणपणी दिसायची स्वर्गातील ‘अप्सरा’, 10 फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष
अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आज अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीच्या सौंदर्याच्या चर्चा देखील चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.
1 / 9
अभिनेत्री ऐश्वर्या रा हिच्या तरुणपणीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.
2 / 9
सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये ऐश्वर्या हिच्या सौंदर्यावर चाहते फिदा झाले आहेत. अनेकांनी तर, अभिनेत्रीचा उल्लेख स्वर्गातील अप्सरा असा देखील केला आहे.
3 / 9
आज ऐश्वर्या बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
4 / 9
ऐश्वर्या हिने बॉलिवूडचा एक काळ गाजवला आहे. ऐश्वर्या तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली.
5 / 9
बॉलिवूडमध्ये करियर करत असताना ऐश्वर्या राय आणि अभिनेता सलमान खान यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा फक्त इंडस्ट्रीमध्येचन नाहीतर, चाहत्यांमध्ये देखील जोर धरू लागल्या होत्या.
6 / 9
ऐश्वर्या राय आणि अभिनेता सलमान खान यांनी एकमेकांना जवळपास 6 वर्ष डेट केलं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
7 / 9
सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात अभिनेता अभिषेक बच्चन याची एन्ट्री झाली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ऐश्वर्या - अभिषेक यांना लग्नाचा निर्णय घेतला.
8 / 9
2007 मध्ये ऐश्वर्या - अभिषेक यांनी लग्न केलं. त्यानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या हिला जन्म दिला. आराध्या हिच्यासोबत अनेकदा ऐश्वर्या हिला स्पॉट करण्यात आलं आहे.
9 / 9
ऐश्वर्या - अभिषेक यांची लेक आराध्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टारकिड पैकी एक आहे. आराध्या हिचे देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.