Akshay Kumar | सेल्फी बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, तरीही अक्षय कुमार मालामाल, तब्बल इतके कोटी फी…
अक्षय कुमार याचे सतत सहा चित्रपट या अगोदर बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले आहेत. यामुळे सेल्फी या चित्रपटाकडून मोठी अपेक्षा होती. मात्र, ओपनिंग डेला चित्रपट काहीच धमाल करू शकला नाही.
1 / 5
अक्षय कुमार हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या सेल्फी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 24 फेब्रुवारी रोजी रिलीज झालाय. मात्र, हा चित्रपट अजूनही बाॅक्स आॅफिसवर धमाका करू शकला नाहीये.
2 / 5
अक्षय कुमार याचे सतत सहा चित्रपट या अगोदर बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले आहेत. यामुळे सेल्फी या चित्रपटाकडून मोठी अपेक्षा होती. मात्र, ओपनिंग डेला चित्रपट काहीच धमाल करू शकला नाही.
3 / 5
सेल्फी चित्रपट तयार करण्यासाठी तब्बल 80 कोटींचे बजेट होते. मात्र, चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस झाले तरीही बाॅक्स आॅफिसवर चित्रपटाची जादू बघायला मिळत नाहीये.
4 / 5
जरी चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाण्याच्या मार्गावर असला तरीही अक्षय कुमार याने या चित्रपटासाठी मोठी फी घेतली आहे. या चित्रपटासाठी अक्षय कुमार याने तब्बल 35 कोटी रूपये घेतले आहेत.
5 / 5
अगोदर अक्षय कुमार हा एका चित्रपटासाठी 50 ते 100 कोटी फी घेत होता. मात्र, अक्षय कुमार याने त्याची फी आता कमी केलीये. यासोबतच इमरान हाश्मी याने या चित्रपटासाठी 7 कोटी रूपये घेतले आहेत.