हेरा फेरी 3 या चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार हा चर्चेत आहे. मध्यंतरी अशी एक चर्चा होती की, अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 या चित्रपटाला नकार दिला असून या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन हा मुख्य भूमिकेत असेल.
अक्षय कुमार हा हेरा फेरी 3 मध्ये दिसणार नाही कळता चाहत्यांमध्ये निराशा बघायला मिळाली. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या जोडीला प्रेक्षक प्रचंड प्रेम देतात.
हेरा फेरी 3 मध्ये अक्षय दिसणार नसल्याचे कळताच चाहते नाराज झाले होते. मात्र, आता अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे.
अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे फक्त एकाच नाही तर तब्बल तीन चित्रपटांमध्येसोबत धमाल करणार आहेत. रिपोर्टनुसार नुकताच यांनी मुंबईमध्ये एक प्रोमो देखील शूट केलाय.
आवारा पागल दीवाना आणि वेलकम मध्येही अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, अजूनही हे स्पष्ट होऊन शकले नाहीये की, अक्षय कुमार हा हेरा फेरी 3 मध्ये असणार की नाही.