Birthday Special : अक्षय कुमारच्या ‘या’ चित्रपटांनी थिएटरमध्ये केला होता धमाका, तोडले बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड

| Updated on: Sep 09, 2021 | 10:29 AM

आज अक्षयच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या त्याच्या 5 चित्रपटांबद्दल जाणून घेऊया. (Akshay Kumar's hit movies)

1 / 6
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आज त्याचा वाढदिवस साजरा करतोय. 7 सप्टेंबर 2021 रोजी अभिनेत्याच्या आईचं निधन झालं. 6 सप्टेंबर रोजी तो आईला भेटण्यासाठी लंडनहून मुंबईला परतला होता. त्याचं चाहते आजही त्याच्यासाठी वेडे आहेत. आज अक्षयच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या त्याच्या 5 चित्रपटांबद्दल जाणून घेऊया.

2 / 6
यातील पहिला चित्रपट 'गुड न्यूज' आहे, DesiBollywood.in च्या मते, या चित्रपटानं बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर 205.14 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत करिना कपूर खान, दिलजीत दोसांझ आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसले होते.

3 / 6
मिशन मंगल - अक्षय कुमार त्याचे अनेक चित्रपट दरवर्षी प्रदर्शित करतो. त्याच्या ‘मिशन मंगल’ या चित्रपटालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंय, या चित्रपटाने बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर 202.98 कोटींचा व्यवसाय केला.

4 / 6
अक्षय कुमारचा चित्रपट ‘हाऊसफुल 4’ 2019मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. या चित्रपटाची गाणी देखील मोठ्या प्रमाणात हिट झाली होती. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सुमारे 194.60 कोटींचा व्यवसाय केला.

5 / 6
अक्षय कुमारला प्रत्येक वेळी काही नवीन पात्र साकारायला आवडतं. त्यानं रजनीकांतच्या प्रसिद्ध चित्रपट '2.0' मध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट भारतात अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटालाही खूप फायदा झाला, या चित्रपटानं बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर 189.55 कोटींचा व्यवसाय केला.

6 / 6
2019 मध्ये, अक्षय कुमार 'केसरी'चा आणखी एक चित्रपट प्रदर्शित झाला, या चित्रपटाच्या गाण्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या चित्रपटात आपण फक्त 21 शीख सैनिक 10000 अफगाणांसोबत युद्ध लढताना पाहतो. या चित्रपटानं बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर 154.41 कोटींचा व्यवसाय केला.