Alia Bhatt | कधीही न पाहिलेले फोटो आलिया भट्ट हिने केले शेअर, अत्यंत रोमँटिक अंदाजामध्ये दिसला रणबीर कपूर
बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही कायमच चर्चेत असते. आलिया काही दिवसांपूर्वी तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग हे काश्मीर येथे करत होती. याबद्दल रणबीर कपूर याने माहिती दिली होती. आज रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा पहिला लग्नाचा वाढदिवस आहे.
1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने 6 नोव्हेंबरला एका गोंडस मुलीला जन्म दिला. विशेष म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा ठेवले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुलीच्या नावाचा अर्थही आलिया हिने सांगितला होता.
2 / 5
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी 14 एप्रिल 2022 रोजी लग्नगाठ बांधली. अचानकच यांनी लग्न करणार असल्याचे जाहिर केले. मोजक्या लोकांमध्ये यांचा विवाहसोहळा हा पार पडला.
3 / 5
आज आलिया आणि रणबीर कपूर यांचा लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. ज्याचे फोटो व्हायरल झाले.
4 / 5
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आलिया भट्ट हिने खास फोटो शेअर केले. विशेष म्हणजे यापूर्वी कधीच हे फोटो समोर आले नव्हते. आलिया हिने शेअर केलेले हे फोटो पाहून चाहतेही आनंदी झाले आहेत.
5 / 5
आलिया हिने हे फोटो शेअर करताना हॅप्पी डे असे कॅप्शन लिहिले आहे. आलियाने शेअर केलेला पहिला फोटो हा त्यांच्या हळदीचा आहे, दुसऱ्या फोटोमध्ये रणबीर कपूर हा गुडघ्यावर बसून आलियाचे हात पकडताना दिसतोय आणि आलिया आकाशाकडे बघते. तिसऱ्या फोटोमध्ये दोघेही रोमंटिक मूडमध्ये दिसत आहेत.