बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे. आलियाने आपल्या मुलीचे नाव राहा ठेवले आहे.
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आलियाने आपल्या मुलीच्या नावाची घोषणा केली आणि सोबतच तिच्या नावाचा अर्थही सांगून टाकला.
आलियाच्या मुलीची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड आतुर आहेत. मात्र, अजूनही आलियाने सोशल मीडियावर मुलीचे फोटो टाकले नाहीयेत.
आलिया पापाराझीच्या कॅमेऱ्यात स्पाॅट झालीये. यावेळी तिने पापाराझीला अनेक पोज देखील दिल्या आहेत. यावेळी तिची आई देखील सोबत दिसत आहे.
आलिया तिच्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त बाहेर पडली होती. यावेळी आलियाचा लूक एकदम सुंदर दिसत होता. पापाराझी आलियाला म्हणाले की, मुलीचे नाव छान ठेवले आहे, यावर आलिया म्हणाली की खूप छान...