टीव्हीची सुंदर अभिनेत्री सुरभी चंदनाने तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांची झोप उडवली आहे. बिकिनी किंवा शॉर्ट ड्रेस न घालता, सुरभीच्या या नवीन फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
नुकतंच, सुरभी इंटरनॅशनल आयकॉनिक अवॉर्ड्स 2021 समारंभात पोहोचली. रेड कार्पेटवर या टीव्हीच्या सुनेनं काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अशी एंट्री केली की प्रत्येकाच्या नजरा तिच्यावर खिळल्या.
त्या पुरस्कार सोहळ्याचे काही फोटो सुरभीनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सुरभीनं अतिशय सुंदर काळा गाऊन परिधान केला आहे.
या ड्रेससोबत तिनं सुंदर कानातले कॅरी केले आहेत, ज्यामुळे तिचा लूक एकदम परफेक्ट बनत आहे.
सुरभीने तिचे केस खुले सोडले आहेत, ज्यामुळे ती अधिकच सुंदर दिसते आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरले आहेत.