Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरचा किलर अंदाज, पाहा हटके फोटो
ब्राऊन कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. (Amruta Khanvilkar's killer look, amazing pictures on Instagram)
1 / 5
‘वाजले की बारा’ म्हणत मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारी, सोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या ‘राझी’ अभिनयाने प्रेक्षकांची मने जिकणारी अभिनेत्री अमृता खानविलकरनं आता नवं फोटोशूट केलं आहे.
2 / 5
चॉकलेट रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
3 / 5
अमृताने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत हक्काचे स्थान निर्माण केले आहे. एवढेच नाही, तर ‘खतरोंके खिलाडी’मध्येसुद्धा तिने जोरदार प्रदर्शन केले. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या सतत संपर्कात असते.
4 / 5
तिच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहते भरभरुन प्रतिसाद देतात. ‘जिवलगा’ या मालिकेनंतर आता पुन्हा अमृता कधी दिसणार?, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
5 / 5
सध्या अमृताचे डान्स व्हिडीओ चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहेत. सोशल मीडियावर तिच्या या व्हिडीओंचा बोलबाला पाहायला मिळतोय.