Ananya Panday | उर्फी म्हणावं की अनन्या… अभिनेत्री नव्या फोटोंमुळे सोशल मीडियावर जोरदार ट्रोल!
अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) ही इंडस्ट्रीतील सर्वात क्यूट अभिनेत्री आहे. अनन्याने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच खूप चाहते निर्माण केले आहेत आणि तिचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.
1 / 6
अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) ही इंडस्ट्रीतील सर्वात क्यूट अभिनेत्री आहे. अनन्याने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच खूप चाहते निर्माण केले आहेत आणि तिचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.
2 / 6
अनन्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करत असते आणि तिच्या नवीन फोटोशूटचे फोटो शेअर करत असते. अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही खास आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
3 / 6
या फोटोंमध्ये अनन्या पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. पण, अनन्याच्या या आउटफिटमध्ये काहीतरी खास आहे. अभिनेत्रीचे संपूर्ण शरीर जाळीने झाकलेले आहे, ज्याचा रंग आऊटफिटशी जुळतो.
4 / 6
अनन्याचा हा पोशाख पाहून तुम्हाला उर्फी जावेदचा तो ड्रेस नक्कीच आठवला असेल, ज्याबद्दल चाहते अनेक प्रश्न विचारताना दिसले होते. आता अनन्यानेही असाच एक विचित्र ड्रेस परिधान करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.
5 / 6
एवढेच नाही तर, तिने स्वतःला एक प्रकारे ट्रोल देखील केले आहे. अभिनेत्रीने स्वतःची तुलना सफरचंदाशी केली आहे. तिने आपल्या फोटोंसोबत सफरचंदाचा फोटोही शेअर केला आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मला पूर्ण कल्पना आहे की, मी जाळीत भरलेल्या फळासारखी दिसतेय.'
6 / 6
अनन्याने तिचे केस मोकळे सोडले आहेत आणि हलका मेकअप केला आहे. हा आउटफिट कॅरी करताना अभिनेत्रीने उर्फी जावेदच्या आउटफिटची कॉपी केली आहे. आता उर्फी जावेदची लोकप्रियता किती वाढत आहे याचा अंदाज बांधता येतो.