Ananya Pandey हिने नवरीच्या रुपात चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका
अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) हिने फार कमी काळात चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अनन्या सध्या 'ड्रीम गर्ल 2' सिनेमामुळे चर्चेत आहे. पण आता अनन्या नव्या फोटोशुटमुळे चर्चेत आली आहे.
1 / 5
अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) हिने नवीन फोटोशूट केलं आहे. अभिनेत्रीने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अनन्या पांडे हिने नवरीच्या रुपात फोटो पोस्ट केल्यामुळे चर्चा रंगल्या आहेत.
2 / 5
अनन्या नवरीच्या रुपात प्रचंड सुंदर दिसत आहे. लाल रंगाच्या लेहेंग्यामध्ये अनन्या हिचं सौंदर्य फुललं आहे. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अनन्या हिच्या नव्या फोटोशूटच्या चर्चा रंगल्या आहेत.
3 / 5
अनन्या हिच्या नव्या फोटोशूटची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. फोटोशुटमुळेच नाही तर अनन्या अभिनेता अदित्य रॉय कपूर हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील चर्चेत असते.
4 / 5
गेल्या अनेक दिवसांपासून आदित्य आणि अनन्या एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरलं आहे. पण दोघांनी देखील त्यांच्या नात्यावर स्पष्टीकरण दिलेलं नाही.
5 / 5
अनन्या सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अनन्या स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.