चंकी पांडेची लेक अनन्या पांडे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी अनन्या ही लंडनला गेली असता तिने आपल्या चाहत्यांसाठी लंडनमधील खास फोटो शेअर केले होते.
अनन्या हिने अगदी कमी वेळामध्ये बाॅलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलीये. लाईगर या चित्रपटामध्ये अनन्या मुख्य भूमिकेमध्ये होती.
अनन्याच्या लाईगर या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. परंतू हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करू शकला नाही. अनेकांना लाईगरमधील अनन्याचा अभिनय आवडला नाहीय.
नुकताच अनन्या पांडे हिने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे अनन्याच्या या फोटोंवर चाहत्यांचे प्रेम मिळत आहेत. अनन्या पांडे हिच्या या फोटोवर कमेंट करत चाहते म्हणाली की, ही तर रवीना टंडन आहे...
अनन्याने पांढऱ्या रंगाच्या मोनोकोनीमध्ये हे फोटोशूट केले आहे. या फोटोंना काही तासांच्या आतामध्येच 3 लाखांपेक्षाही अधिक लाईक मिळाले आहेत.