बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची धाकटी मुलगी रिया आज 14 ऑगस्टला करण बूलानीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्यासाठी आज रियाच्या घरी लग्नाची चांगलीच तयारी सुरू झाली आहे. त्यांचं घर मस्त सजवण्यात आले आहे.
नुकतंच फोटो समोर आले आहेत ज्यात अनिल कपूरचं घर सुंदर सजलेलं दिसत आहे.
रियाचे लग्न जुहू येथील अनिल कपूरच्या घरी होणार आहे, त्यामुळे संपूर्ण घर एका खास पद्धतीने सजवण्यात आलं आहे.
रंगीबेरंगी लाईट्सनं सजवलेल्या अनिल कपूर यांच्या बंगल्याबाहेरील हे फोटो समोर आले आहेत. असं सांगितलं जात आहे की लग्नाच्या सगळ्या विधी येथे होणार आहेत.
रिया आणि करण पहिल्यांदा आयेशा चित्रपटाच्या सेटवर भेटले होते, त्यानंतर हे दोघे एकमेकांच्या जवळ आले.