अविका गौरचं भन्नाट बॉडी ट्रान्सफॉरमेशन, साडीत अभिनेत्रीच्या अदा पाहून व्हाल घायाळ
‘बालिका वधू‘ (Balika Vadhu) मालिकेत ‘आनंदी’ भूमिकेला न्याय देत अभिनेत्री अविका गौर (Avika Gor) हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण लहानपणी गोंडस दिसणार अविता आता प्रचंड ग्लॅमरस आणि सुंदर दिसते. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
1 / 5
‘बालिका वधू‘ (Balika Vadhu) मालिकेत ‘आनंदी’ ही भूमिका साकारणीर अविका कौर आता प्रचंड सुंदर दिसते अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
2 / 5
सध्या सोशल मीडियावर अविका हिने साडी नेसलेले काही फोटो व्हायरल होत आहेत. काळ्या साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.
3 / 5
‘बालिका वधू’ मालिकेत अविका गौरने लहानग्या आनंदीची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतही ती सहाय्यक भूमिकेत झळकली होती.
4 / 5
अभिनेत्री काही तेलुगू आणि कन्नड चित्रपटांतही काम केलं आहे. मात्र करिअरमध्ये अविकाला वाढत्या वजनामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं.
5 / 5
अखेर, ‘फॅट टू फिट’ चॅलेंज स्वीकारत अविकाने आपलं ट्रान्सफॉर्मेशन करुन घेतलं. आता अविका तिच्या भन्नाट बॉडी ट्रान्सफॉरमेशनमुळे चर्चेत असते.