Photo : ‘मिमी’ चित्रपटापूर्वी बॉलिवूडमध्ये ‘या’ चित्रपटांमधून करण्यात आलं होतं सरोगेसीवर भाष्य
'मिमी' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच होताच सरोगेसीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मिमी हा पहिला चित्रपट नाही, जो सरोगेसीवर आधारित आहे, यापूर्वीही बॉलीवूडमध्ये सरोगेसीवर अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहेत. (Before 'Mimi' there was few Bollywood movies on the topic of surrogacy )
1 / 7
कृती सॅनॉनला मिमीमध्ये सरोगेट मदर म्हणून पाहल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला. मिमीचा ट्रेलर लाँच होताच सरोगेसीचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. मिमी हा पहिला चित्रपट नाही, जो सरोगेसीवर आधारित आहे, यापूर्वीही बॉलीवूडमध्ये सरोगेसीवर अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहेत.
2 / 7
मिमी : मिमीमध्ये कृती सॅनॉन पहिल्यांदाच तिच्या प्रतिमेतून बाहेर आली आहे. सरोगेट आईच्या रूपात दिसणाऱ्या कृतीनं या पात्रासाठी आपलं वजन वाढवलं आहे. कृती यात एका नृत्यांगनेची भूमिका साकारत आहे, जी पैशाच्या लोभामुळे सरोगेट आई बनते. या चित्रपटाबद्दल कृती खूप उत्साही आहे आणि तिला खात्री आहे की हा चित्रपट तिच्यासाठी एक महत्त्वपूर्ण वळण ठरेल.
3 / 7
दूसरी दुल्हन : 1983 मध्ये रिलीज झालेल्या ‘दूसरी दुल्हन’ या चित्रपटात शबाना आझमीनं पहिल्यांदा सरोगेट आईची भूमिका साकारली होती. चाहत्यांमध्ये या विषयाबद्दल जागरूकता नसल्यामुळे हा चित्रपट व्यावसायिक पद्धतीनं फ्लॉप ठरला.
4 / 7
चोरी चोरी चुपके चुपके : प्रीती झिंटानं एकदा चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटात नर्तक मधुबालाची भूमिका साकारली होती. चित्रपटात सलमान खान तिला सरोगेट आई बनण्याची ऑफर देतो. त्यावेळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.
5 / 7
फिलहाल : मेघना गुलजार दिग्दर्शित चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर आपला ठसा उमटवला नसला तरी समीक्षकांच्या मने हा चित्रपट उत्तम आहे. यात सुष्मिता सेन सरोगेट आईच्या भूमिकेत आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झाले.
6 / 7
विकी डोनर : विकी डोनरमध्ये सरोगसीचे संपूर्ण वर्णन केले नसलं तरी त्यात काही प्रमाणात सरोगसीची झलक दिसून आली आहे. खरं तर, विक्की डोनरमध्ये शुक्राणूंचा व्यवसाय हायलाइट करण्यात आला. जॉन अब्राहमच्या निर्मितीत तयार झालेला हा चित्रपट आयुष्मानच्या कारकीर्दीचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.
7 / 7
गुड न्यूज : आयव्हीएफवर आधारित या चित्रपटात करीना कपूर खान आणि कियारा अडवाणी चुकून एकमेकांच्या मुलाला गर्भाशयात घेऊन जातात. या चित्रपटातही सरोगसीवर भाष्य करण्यात आलं आहे.