बिग बॉस विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने बर्फातला फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तेजस्वी प्रकाशचा भाऊ प्रतिक याचा आज वाढदिवस आहे. त्याच्या सोबतचे फोटो शेअर करत तिने प्रतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
"I love you so much... तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!, तू माझं पहिलं बाळ आहेस तुला मी सांभाळलं आहे पण आता तू मोठा होतोय, अधिक प्रगल्भ होतोय, हे पाहून आनंद होत आहे. लवकरच आपण भेटूयात", असं तेजस्वी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाली आहे.
तिच्या या फोटोला सव्वा लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर अनेकांनी कमेंट करत प्रतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तेजस्वी प्रकाश बिग बॉस 15 ची विजेती ठरली आहे. प्रतिक सेहेजपालला मागे टाकत बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली. आता ती नागीन या मालिकेत काम करत आहे.