बिग बॉस 14 ची विजेती रुबिना दिलैक सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.
रुबिनाने तिच्या बोल्ड फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिनं साटन क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्ट परिधान केला आहे. रुबिनाचा नेकपीस या लूकला पूरक करत आहे.
फोटो शेअर करताना रुबिनानं लिहिलं - हॅलो ऑगस्ट, तुझं आणि माझं विशेष कनेक्शन आहे. रुबिनाच्या फोटोंवर अनेक सेलेब्सनी कमेंट केल्या आहेत.
तिचे चाहतेही तिच्या फोटोंवर कमेंट्स करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. एका चाहत्यानं लिहिलं - परम सुंदरी. तर दुसऱ्याने फायर इमोजी कमेंट केली.
रुबीनाचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.