Abdu Rozik | अब्दू रोजिक याने केला खळबळजनक खुलासा, बिग बॉस 16 नंतर तुटली मंडलीमधील मैत्री?
बिग बॉस 16 नंतर एक नाव प्रचंड चर्चेत आहे ते म्हणजे अब्दू रोजिक याचे. अत्यंत कमी कालावधीमध्ये अब्दू रोजिक याने चांगला फॅन बेस भारतामध्ये तयार केला. अब्दू रोजिक याने बिग बॉस 16 मध्ये धमाल केलीये.
1 / 5
बिग बॉसच्या 16 व्या सीजनने धमाल केली. विशेष म्हणजे हे सीजन टीआरपीमध्येही टाॅपला राहिले. एमसी स्टॅन हा बिग बॉस 16 चा विजेता ठरला. शिव ठाकरे आणि प्रियंका चाैधरी यापैकी एकजण बिग बॉस 16 चा विजेता होईल, असे सर्वांनाच वाटत होते.
2 / 5
एमसी स्टॅन याची फॅन फाॅलोइंग जबरदस्त असल्याने एमसी स्टॅन हा बिग बॉस 16 चा विजेता झाला. बिग बॉस 16 मध्ये मैत्री बघायला मिळाली. साजिद खान, एमसी स्टॅन, अब्दू रोजिक, शिव ठाकरे, निम्रत काैर आणि सुंबुल ताैकीर यांच्यामध्ये खास मैत्री होती.
3 / 5
अब्दू रोजिक, साजिद खान, एमसी स्टॅन, शिव ठाकरे, निम्रत काैर आणि सुंबुल ताैकीर यांच्या मैत्रीचे नाव अर्चना गाैतम हिने मंडली असे ठेवले. बिग बॉस 16 च्या शेवटपर्यंत यांची खास मैत्री बघायला मिळाली.
4 / 5
नुकताच अब्दू रोजिक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अब्दू रोजिक याला मंडळीबद्दल विचारण्यात आले आहे. यावेळी अब्दू रोजिक जे बोलतो ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.
5 / 5
अब्दू रोजिक म्हणाला की, आता कोणती मंडळी राहिली नाही. अब्दू रोजिक याचे हे बोलणे ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. मंडलीमध्ये काही वाद झाला का? या प्रश्न चाहत्यांकडून विचारला जात आहे.