Khatron Ke Khiladi 13 | बिग बाॅस 16 मधील स्पर्धक रोहित शेट्टी याच्या खतरो के खिलाडी 13 मध्ये करणार धमाका, पाहा लिस्ट
बिग बाॅस 16 चा फिनाले नुकताच पार पडलाय. एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 चा विजेता झाला. बिग बाॅस 16 चा फिनाले होऊन काही दिवस उलटले आहेत. मात्र, अजूनही बिग बाॅसमध्ये सहभागी झालेले स्पर्धेक पार्ट्यांमध्ये बिझी आहेत.
1 / 6
बिग बाॅस 16 चा फिनाले नुकताच पार पडलाय. एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 चा विजेता झाला. बिग बाॅस 16 चा फिनाले होऊन काही दिवस उलटले आहेत. मात्र, अजूनही बिग बाॅसमध्ये सहभागी झालेले स्पर्धेक पार्ट्यांमध्ये बिझी आहेत. विशेष म्हणजे बिग बाॅस 16 मधील अनेक स्पर्धेक हे खितरो के खिलाडी 13 मध्ये सहभागी होणार आहेत.
2 / 6
शिव ठाकरे हा खतको के खिलाडीमध्ये सहभागी होऊ शकतो. बिग बाॅस 16 मध्ये धमाकेदार गेम शिव ठाकरे याने खेळला आहे. विशेष म्हणजे बिग बाॅसनंतर शिव ठाकरे याच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झालीये.
3 / 6
अंकित गुप्ता हा बिग बाॅस 16 मध्ये सहभागी झाला होता. मात्र, बिग बाॅसमध्ये काही विशेष धमाका अंकित गुप्ता हा करू शकला नाही. आता हा खतरो के खिलाडीमध्ये अंकित काय करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
4 / 6
प्रियंका चाैधरी ही बिग बाॅ 16 पासून प्रचंड चर्चेत आलीये. मात्र, बिग बाॅसमध्ये चांगला गेम खेळूनही तिला अजून कोणत्याही शोची किंवा चित्रपटाची आॅफर मिळाली नाहीये. रिपोर्टनुसार ती अंकित गुप्ता याच्यासह खतरो के खिलाडीमध्ये सहभागी होऊ शकते.
5 / 6
बिग बाॅस 16 मधील सदस्य सौंदर्या शर्मा ही देखील खतरो के खिलाडीमध्ये सहभागी होऊ शकते, असे सांगितले जातंय. सौंदर्या शर्मा हिचा गेम बिग बाॅसच्या घरात चांगला बघायला मिळाला.
6 / 6
बिग बाॅस 16 मधील वादग्रस्त स्पर्धेक अर्चना गाैतम ही देखील खतरो के खिलाडीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. बिग बाॅसनंतर आता खतरो के खिलाडीमध्ये अर्चना गाैतम काय धमाका करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.