‘बिग बॉस’ फेम प्रियांका चाहर हिची प्रकृती खालावली, रुग्णालयातील पहिला फोटो समोर
'बिग बॉस' फेम प्रियंका चाहर चौधरी हिची प्रकृती खालावल्यामुळे अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल केलं आहे. रुग्णालयातील अभिनेत्रीचा पहिला फोटो देखील समोर आला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे.
1 / 5
'बिग बॉस' फेम प्रियंका चाहर चौधरी हिची प्रकृती खालावल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केलं आहे. अभिनेत्रीची प्रकृती स्थिर नसल्याचं कळताच चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. प्रियंका लवकर बरी व्हावी म्हणून चाहते प्रार्थना करत आहेत. आभिनेत्री प्रकृतीबद्दल माहिती देखील समोर आली आहे.
2 / 5
इन्स्टाग्रावर प्रियांका हिच्या जवळच्या मैत्रिणीने अभिनेत्रीच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. मैत्रीणीने प्रियंका हिच्या हाताचा एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीला सलाइन लावल्याचं दिसून येत आहे. पण अभिनेत्रीला नक्की काय झालं आहे, हे कळू शकलेलं नाही.
3 / 5
फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सांगायचं झालं तर, प्रियंका हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्रीने फक्त 'बिग बॉस'मध्ये नाही तर, अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.
4 / 5
प्रियंका लवकरच नव्या सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेत्रीसोबत अभिनेता तुषार कपूर असणार आहे. याआधी अभिनेत्री अभिनेता रणदीप हुड्डा याच्यासोबत एका म्यूझिक व्हिडीओमध्ये दिसली होती.
5 / 5
सोशल मीडियावर देखील प्रियंका कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.