‘बिग बॉस मराठी 3’चा विजेता Vishal Nikam नव्या भूमिकेत; ‘या’ मालिकेत करणार काम
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन प्रेक्षकांना प्रचंड गाजला. या पर्वात विशाल निकम याने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मनं जिंकली. बिग बॉस मराठी संपल्यानंतर आता विशाल निकम कुठल्या कार्यक्रमात येणार? कुठल्या भूमिकेत त्याला बघायला मिळणार? याची सगळ्यांनाच खूप उत्सुकता होती.
1 / 5

2 / 5
आता प्रतीक्षा संपली असून विशाल लवकरच नव्या भूमिकेत आपल्याला भेटायला येणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील आई मायेचं कवच मालिकेमध्ये त्याची लवकरच एंट्री होणार आहे.
3 / 5
विशाल मालिकेत मानसिंग नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. आता हा मानसिंग नक्की कोण आहे? त्याचा काय हेतु आहे? हे अजून गुलदस्त्यात आहे.
4 / 5
विशाल निकम या भूमिकेबद्दल म्हणाला, "बिग बॉस मराठीनंतर अॅक्टिंग पुन्हा एकदा सुरू होत आहे, त्याबद्दल आनंद आहे. बिग बॉस मराठी संपल्यानंतर ठरवलं होतं की प्रेक्षकांचं मनोरंजन करेन आणि आज पहिलं पाऊल उचललं आहे. खूप मोठी जबाबदारी आहे."
5 / 5
"मानसिंग हे पात्र आजपर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळं असं पात्र आहे. आव्हानात्मक आहे, मालिकेत उत्तम कलाकार आहेत आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळणार आहे. मानसिंग प्रत्येकाच्या मनात छाप सोडून जाईल असाच प्रयत्न असेल माझा आणि तितकी मेहनत मी घेणार हे नक्कीच”, असंही तो म्हणाला.