Birthday Special : सुनील शेट्टीला ‘या’ अभिनेत्रीवर होता क्रश, जाणून घ्या काही खास गोष्टी
चाहत्यांमध्ये सुनील 'अण्णा' म्हणून प्रसिद्ध आहेत. 1992 मध्ये बलवान या चित्रपटानं त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. (Birthday Special: Sunil Shetty had a crush on this actress, know some special things)
1 / 6
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी अजूनही लाखो हृदयांवर राज्य करत आहेत. रोमान्स असो किंवा अॅक्शन, सुनील शेट्टी नेहमीच प्रत्येक भूमिकेत बसतात, आज सुनील शेट्टी यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 11 ऑगस्ट 1961 रोजी कर्नाटकात झाला होता.
2 / 6
चाहत्यांमध्ये सुनील 'अण्णा' म्हणून प्रसिद्ध आहेत. 1992 मध्ये बलवान या चित्रपटानं त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर ते 'वक्त हमारा है' मध्ये दिसले.
3 / 6
सुनील शेट्टी यांनी आपल्या कारकिर्दीत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या. सुनील यांनी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळवली आहे हे क्वचितच कोणाला माहित असेल.
4 / 6
अभिनया व्यतिरिक्त, सुनिल शेट्टीकडे अनेक हॉटेल्स आहेत जी बरीच लोकप्रिय आहेत. त्यांना किक बॉक्सिंगमध्येही ब्लॅक बेल्ट मिळाला आहे.
5 / 6
मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना एकेकाळी अभिनेत्री सोनाली बेंद्रेवर क्रश होता. सुनील आणि सोनाली यांनी पडद्यावर एकत्र काम केलं आहे.
6 / 6
चाहत्यांना क्वचितच माहित असेल की, सुनील शेट्टी यांच्या 'बलवान' या पदार्पणाच्या चित्रपटादरम्यान ते नवखे असल्यानं एकही अभिनेत्री त्यांच्यासोबत काम करण्यास तयार नव्हती. मात्र त्यावेळेस दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती यांनी त्यांच्यासोबत काम करणं सुरू ठेवलं होतं.