बॉलिवूड अभिनेता अभय देओल हा निर्माते अजित सिंह यांचा मुलगा आहे तर प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचा पुतण्या आहे.
2005 मध्ये त्याने इम्तियाज अली यांच्या 'सोचा ना था' या सिनेमातून करिअरला सुरूवात केली. हा सिनेमा तिकिटबारीवर कमाल दाखवू शकला नसला तरी त्याने अभय देओल आणि आयेशा टाकिया यांना बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करून दिलं.
2009 साली अनुराग कश्यप यांच्या 'देव डी' या सिनेमाने मात्र अभयला ओळख दिली. या सिनेमातील त्याच्या कामाचं विशेष कौतुक झालं.
त्यानंतर अभयच्या आयुष्यात आला ब्लॉकबस्टर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा जोया अख्तरचा सिनेमा. या सिनेमातील कामासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
अभयने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सोनम कपूरसोबतचा 'रांझना', 'आयेशा', 'शांघाय', 'आहिस्ता आहिस्ता', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हे त्याचे नावाजलेले सिनेमे.