“असं वाटलं अख्खं जग थांबलं”, विकेंडला बिग बीचे ‘हे’ पाच ट्विट तुम्हाला आयुष्याबद्दल बरंच काही सांगून जातील…
महानायक अमिताभ बच्चन यांचा अभिनय जितक्या ताकदीचा आहे तितकेच त्यांचे विचारही अनमोल आहेत. मागच्या काही दिवसांपासून अमिताभ बच्चन काही ट्विट करत आहेत. या ट्विटमधले विचार आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोन बदलू शकते...
1 / 5
महानायक अमिताभ बच्चन यांनी आज एक ट्विट केलं आहे. एक प्रकारे ते आयुष्याकडे बघण्याचा मंत्रच देत आहेत. त्यांनी आपल्या ट्विमध्ये म्हटलंय की "अक्षमताच अक्षमतेला आश्रय देते." एक प्रकारे त्यांनी जगण्याचा मूलमंत्रच दिला आहे. आपल्या क्षमतेच्या कक्षा रुंदावणं गरजेचं असल्याचंच त्यांनी एक प्रकारे सांगिलतलं आहे.
2 / 5
काल अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केलं होतं. त्यात ते म्हणतात की "आज अचानक कामातून सुट्टी मिळाली आणि एका क्षणाला वाटलं की आपलं आयुष्यच थांबलं." अमिताभ नेहमी आपल्या कामात व्यस्त असतात. त्यांच्याकडून सतत काम राहण्याची प्रेरणा आपण घेऊ शकतो.
3 / 5
काही दिवसांआधी बिग बी अमिताभ यांनी एक ट्विट केलं होतं ज्यामुळे अनेकजण बुचकळ्यात पडले होते. "जा... मी काहीही लिहिणार नाही, काय करणार?", असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
4 / 5
अमिताभ बच्चन हे प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांचे पुत्र आहेत. त्यांना वाचनाची विशेष आवड आहे. ते आपल्या वडिलांच्या काही कविताही सादर करताना दिसतात. असंच पुस्तकांच्या अनुषंगाने त्यांनी एक ट्विट केलं होतं. "ज्या घरात पुस्तकं असतात, तिथं किती साऱ्या गोष्टींचा वास असतो", असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. हे ट्विट त्यांचं साहित्य प्रेम दर्शवतं.
5 / 5
बिग बींनी आयुष्याबाबत एक ट्विट केलं होतं. "आपलं आयुष्य खूप चतूर आहे. रोज नवा दिवस देतं आणि आपल्या हातात वाढतं वय टेकवतं... आपलं वय काढून घेतं", हे आपल्या आयुष्याशी समर्पक ट्विट त्यांनी केलं होतं.