वरिष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी नुकतं अटारी बॉर्डरला भेट दिली. तिथले फोटो प्रसिद्ध झाेले आहेत.
नाना पाटेकर यांनी भारतीय सैन्य दलातील बीएसएफ जवानांशी संवाद साधला. त्यांचं मनोबल वाढवलं. यावेळी ते म्हणाले की "ही तरूणांसाठी चांगली संधी आहे. तरूणांनी सैन्यांत भरती व्हायला हवं."
अटारी बॉर्डरवर पोहोचल्यानंतर नाना पाटेकर यांचं बीएसएफ टोपी देऊन स्वागत करण्यात आलं.यावेळी त्यांनी बीएसएफ संग्रहालयाला भेट दिली. भारतीय सीमांचं रक्षण करत असल्याबद्दल जवानांचे आभार मानले.
यावेळी तिथे काही स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यालाही नाना पाटेकर यांनी हजेरी लावली.
नाना पाटेकर एक संवेदनशील अभिनेते म्हणून ओळखले जातात. 'नाम' फाऊंडेशनच्या माध्यमातून ते विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात.